Girish Mahajan On Maratha Aarakshan : कोणतंही उपोषण असोत वा आंदोलन.. उपोषण सोडवायला किंवा आंदोलन शमवायला सरकारच्या वतीनं पहिले जातात ते गिरीश महाजन.. सरकारसाठी अनेक आंदोलनात महाजन संकटमोचक ठरलेत. मात्र सध्या सुरु असलेल्या मराठा आंदोलनाबाबत महाजनांनी एक असं विधान केलंय ज्यामुळेत तेच संकटात आल्याची चर्चा आहे. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं गिरीश महाजन म्हणालेत.  महाजनांच्या विधानावर जरागेंनी टोला लगावलाय. दोन दिवसात सरकार आरक्षणाचा तुकडा पाडेल असा विश्वास असल्याचा टोला जरांगेंनी लगावला आहे.


अल्टिमेटम संपल्यानंतरचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही - जरांगेचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्टिमेटम संपल्यानंतरचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी आधीच दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर मराठ्यांनो, हातघाईवर येऊ नका हा महाजनांनी दिलेला इशारा वादाचा विषय ठरतोय. 


कुणबींवरून अजित पवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना 


कुणबींवरून अजित पवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना सुरू झाला आहे. मनोज जरांगेंच्या सभेला कुणबी का जातात? असा सवाल अजित पवारांनी आज कुणबी समाजाला केला. त्यावर आमची एकी पाहवत नाही का? असा उलट सवाल जरांगे पाटलांनी केला. आमच्यात फूट का पाडता, अशी विचारणाही त्यांनी केली.


मराठा आरक्षणावरून मराठा संघटनांमध्येच वाद 


मराठा आरक्षणावरून मराठा संघटनांमध्येच वाद पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आम्हाला कुणबी नको तर मराठाच आरक्षण हवं अशी भूमिका काही मराठा नेत्यांनी घेतलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला कुणबीची मलमपट्टी नको, मराठा आरक्षणच मिळायला हवं अशी भूमिका माडंलीय. तसच मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणीही या नेत्यांनी केलीय. 


मनोज जरांगेंनी नेत्यांना गावबंदी केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक 


मनोज जरांगेंनी नेत्यांना गावबंदी केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी क्रीडामंत्री संजय बनसोडेंचा ताफा अडवला. उदगीर तालुक्यातील वाढवाणा पाटी इथून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. गावबंदी असताना तुम्ही गावात का आलात, असा जाब मराठा कार्यकर्त्यांनी विचारला. क्रीडामंत्री संजय बनसोडेंना काळे झेंडेही दाखवण्यात आले. याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.  400 जातीचा समूह असलेल्या ओबीसी समाजाच्या अधिकारावर गदा येईल तेव्हा तो रस्त्यावर उतरेल असा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी दिलाय.