रायगड जिल्ह्यात वडिलांनी टीव्ही बंद केला म्हणून मुलीची आत्महत्या
रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. टीव्ही बघत असताना वडिलांनी तो बंद केल्याने मुलीला राग आहे. या रागाच्या भरात अल्पवयीने मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. १५ वर्षीय मुलीने साडीच्या सहायाने गळफास घेतला. ही घटना तळा तालुक्यात घडली.
खांबोली गावात या मुलीचे कुटुंब राहते. सर्व कुटुंबीय एकत्र टीव्ही पाहत होते. त्यावेळी ही मुलगीही त्यांच्यासोबत घरात टीव्ही पहात बसली होती. दरम्यान, टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना वडिलांनी टीव्ही बंद केला. याचा राग या मुलीला आहे. या मुलीने रागातून टोकाचे पाऊल उचलले. तिने घराच्या दुसऱ्या खोलीत जाऊन साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . याची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.