अमरावती : जिल्ह्यातील टेम्भुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विधार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती. शपथ देणाऱ्या शिक्षकांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या एका विद्यार्थीनीने प्रेमविवाह केल्याची बाब पुढे आली आहे. ही मुलगी काही दिवस बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत होते. तिने विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला महाविद्यालयातील शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विधार्थिनींच महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू झाले. आणि आता या सगळ्यात मोठ्ठा ट्विस्ट आलाय.  प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी एक विद्यार्थीनी प्रियकरासोबत पसार झाली. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर महाविद्यालय प्रशासन म्हणण्यानुसार शपथेच्या दिवशी ही मुलगी गैरहजर होती. पण सध्या शाळेत सुरू असलेल्या आंदोलनात ती सहभागी होती.