पुणे : काही मद्यधुंद मुलं एका मुलीची भर रस्त्यात छेड काढत असल्याचा व्हिडीओ सध्या पुण्यात व्हायरल झालाय. हा व्हिडीओ नगर रोडवरील चंदन नगर परिसरातील असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात कुठलीच तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केलाय. मुलीची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या मुलांचा सुगावा लागला असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.