GK : `भोसरी`चे जुने नाव माहित आहे का? महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव
Bhosari Village : भोसरी हे हाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव आहे. जाणून घेऊया भोसरी हे नाव कसे पडले.
Bhosari Village In Pune : प्रत्येक शहराला किंवा गावाला त्याच्या वेगळेपणामुळे ओळख मिळते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असे गाव आहे जे त्याच्या नावामुेळ नेहमीच चर्चेत असते. हे म्हणजे पुण्यातील भोसरी. नावामुळेच महाराष्ट्रात नाही तर देशभरात हे गाव प्रसिद्ध आहे. पण भोसरी या गावाचे जुने नाव माहित का आहे. जाणून घेऊया भोसरी या गावाचा आणि नावाचा अनोखा इतिहास.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी
भोसरी हे पुणे जिल्ह्यात असलेले छोटेसे गाव आहे. गाव छोटं असलं तरी याची चर्चा मात्र मोठी आहे. पुणे शहराच्या उत्तरेला सतरा किलोमीटरवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत भोसरी हे गाव येते. भोसरी गावचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन काळापासून भोजापूर, भवसरी अशा नावाने प्रवास करत भोसरी हे नाव मिळाले आहे. हे शहर भोज राजाची राजधानी होती. भोसरी हे पूर्वी भोजापूर ह्या नावाने ओळखले जात असे. यामुळे भोसरीचे जुने नाव भोजापूर असे आहे.
असे पडले भोसरी हे नाव
राजा भोज यांची राजधानी म्हणून हे भोजापुरी नावाने ओळखले जायचे. या नावाचा अपभ्रंश भोसावरी आणि त्यानंतर भोसरी असा झाला आहे. आता हे गाव भोसरी म्हणूनच ओळखले जाते. भोसरीत इतिहासाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. मातीचे मडके तसेच काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी 200 ते 280 च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. भोसरीत एमआयडीसी आहे. पुणे शहरापासून जवळ असल्याने या गावचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र, भोसरीतील ग्रामस्थांनी जत्रा-उत्सव, बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, तालीम मंडळ जपत गावपण जपले आहे.