सोलापूर : Ranjitsinh Disle : येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disle) यांना अमेरिकन सरकारकडून (American government) दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप (Fulbright Scholarship) जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. याआधी 'ग्लोबल टीचर' पुरस्कारानंतर  (Gloal Teacher) डिसले गुरुजी यांच्या नावाची देशभर चर्चा झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पीस इन एज्युकेशन' या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. 'लेट्स क्रॉस द बॉर्डर' या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजी यांनी सांगितले.


जगभरातील प्रतिभावान  शिक्षकांना एकत्र आणून  जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी यामुळे मिळते. अमेरिकेतील शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते. ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे 75 वे वर्ष आहे.


'ग्लोबल टीचर' म्हणून ख्याती असणारे डिसले गुरुची यांची जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांत निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्यावतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला. तसेच डिसले गुरुजी यांची जागतिक बॅंकेच्या शिक्षण सल्लागार पदी देखील निवड झालेली आहे.