नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीची प्रथा बंद करण्यात आली आहे. दरवर्षी दसर्‍याच्या गडावर बक-याचा बळी देण्याची प्रथा आहे. यावर्षीपासून प्रशासनानं ही प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या प्रथेमुळे गडावर निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगरोचंगरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे पशुहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाउल उचललंय.


या निर्णयाबाबत भाविकांमध्ये दोन भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर काही भाविकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.