प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई :  वसईच्या भूईगाव या समुद्रात हरवलेली एक सोन्याची चैन (Golden Chain) पुन्हा सापडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. त्यामुळे ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेची वसईत (Vasai) चर्चा रंगली आहे. (gold chain lost in the sea of ​​Vasai was found again after 48 hours shocking story)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईचा प्रितम डायस हा तरूण भुईगाव (Bhuigaon) समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राची भ्रमंती करवतो. त्याच्या स्वत:च्या मालकीची बोट देखील आहे. गेल्या शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे तो खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी  जातं होता. यावेळी भरतीमुळे समुद्रात कपडे भिजू नये म्हणून त्याने टी-शर्ट व बनियन काढले होते. या धावपळीत त्याच्या गळ्यात असलेली पावणे दोन तोळ्याची सोन्याची चैन (Golden Chain) व त्याला अडकून असलेली रोझरी समुद्रात पडल्याची घटना घडली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यात सोन्याची चैन आणि रोझरी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सोन्याची चैन आणि रोझरी समुद्रात पडल्याचा अंदाज बांधत हरविल्याची खंत व्यक्त केली. 


किनाऱ्यावर सोन्याची चैन सापडली 


ही संपुर्ण घटना त्याने कोणालाचं सांगितली नव्हती. मात्र त्याला खरा आश्चर्यचा धक्का तेव्हा बसला, ज्यावेळेस 48 तासांनी ओहोटीच्या वेळी पुन्हा किनाऱ्यावर वावरताना त्याला समुद्राच्या वाळूत रोझरी पडलेली दिसली. ती रोझरी त्याने उचलली व त्याला अडकून असलेली सोन्याची चैन (Golden Chain) ही त्याला सापडली. हा संपुर्ण प्रकार पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. समुद्रात हरवलेली चैन दुसऱ्या-तिसऱ्याला न सापडता मलाच सापडावी, ही परमेश्वराचीच देण आहे असं प्रीतम या घटनेवर सांगत आहे. 


दरम्यान प्रितम डायस सोबत घडलेली ही घटना आश्चर्यकारक आहे. अनेकांना या घटनेवर विश्वासच बसत नाही आहे. मात्र ही घटना खरी आहे. काहींना ही देवाची कृपा वाटतेय, तर काहींना हा चमत्कार वाटतो आहे. या घटनेची संध्या संपुर्ण वसईत चर्चा आहे. ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.