जळगाव : जीएसटी कायद्यांतर्गत केंद्र सरकारने दोन लाखाच्या आत सोने खरेदीवरील पॅन कार्डची सक्ती हटवलीय. यामुळे जळगावातील सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा सराफांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी पॅनकार्डची सक्ती केल्यानं करापोटी लागणा-या दंडाच्या भीतीनं सोने खरेदीचा कल कमी झालेला होता. ऐन दिवाळीत सोने खरेदीला ब्रेक लागला होता. त्यामुळे व्यापारी वर्ग सरकारच्या भूमिकेवर नाराज होता.


आता सोनेखरेदी मनी लाँड्रिंगमुक्त केल्यानं जळगावमधील व्यापारी सरकारच्या निर्णयावर खुश झालेत. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल बाफना यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना आभाराचं पत्र पाठवलंय.