उर्फीशी लग्न करणार? पापाराझींनी प्रश्न विचारताच ऑरीनं दिलं असं उत्तर

आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी सहज व्हायरल होतात आणि बराच काळ चर्चेतही राहतात. एक अशी वेळ होती जेव्हा सोशल मीडियावर फक्त उर्फी जावेदच्या चर्चा सुरु असायच्या. ती आजही तिच्या आउटफिट्ससाठी सगळ्यांमध्ये चर्चेत राहते. आता तिच्या कॉम्पिटीशनमध्ये एक नवीन नाव समोर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ते म्हणजे ऑरी. आता ऑरीचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. आता पहिल्यांदा ते दोघं एकत्र स्पॉट झाले आहेत. यावेळी त्यांच्या लग्नाविषयी ते बोलताना दिसले.  

| Jun 15, 2024, 18:17 PM IST
1/7

सोशल मीडियावर त्यांची एक क्लिप व्हायरल होतेय. ज्यात ऑरी आणि उर्फी कॅमेऱ्या समोर पोझ देताना दिसत आहेत. त्या दोघांनी एनर्जी आणि केमिस्ट्रीनं सगळ्यांना आनंद झाला. 

2/7

ऑरी आणि उर्फीनं पापाराझींसमोर खूप गोष्टी सांगितल्या आणि एकमेकांना मिठी मारली. तर ऑरीला पापाराझींनी प्रश्न विचारला की तो DIY एक्सपर्टशी लग्न करायला तयार आहे का? 

3/7

ऑरीनं पापाराझींच्या या प्रश्नावर उत्तर देत सांगितलं की 'का नाही, कोण करणार नाही?' याशिवाय उर्फीनं पापाराझींसमोर ऑरीला गालावर किस देखील केलं. त्यानंतर सगळीलोक ओरडू लागले. 

4/7

त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ऑरीनं मरुन रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे आणि त्याचं रंगाचं लोअर देखील परिधान केलं आहे. तर उर्फीनं हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. 

5/7

त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यावर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

6/7

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला नाही माहित का पण पहिल्यांदा... मला एकमेकांसोबत हे खूप चांगले दिसले. ते एकत्र चांगले दिसतायत.' 

7/7

उर्फी ही ऑरी, अनन्या पांडे आणि सुहाना खानसोबत पार्टी करताना स्पॉट झाली होती. त्यांचो फोटो व्हिडीओ व्हायरल झाले होते.