मुंबई : सोनं खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी. 9 महिन्यांनंतर सोनं पुन्हा 47 हजारांखाली (Gold price : Yellow metal holds 46,900)  आलं आहे. यामुळे सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे. सोन्याचा भाव 46 हजार 900वर आताचा आहे. आयात शुल्क कपातीपाठोपाठ डॉलरचे दरही कमी झाल्यानं सोन्याच्या दरांत घसरण पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन असलं तरी गेल्या वर्षी मे महिन्यात बाजारात उलाढाल होऊन सोने-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम होती. मात्र त्यानंतर आता सोन्याचे भाव कमी होताना पहायला मिळतायत. आयात शुल्कात कपातीपाठोपाठ आता डॉलरचे दरही कमी होऊ लागल्यानं सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण होत आहे.


19 फेब्रुवारीला सोन्याच्या भावात 400 रुपयांची घसरण होऊन दर 46 हजार 900 रुपयांवर आले. चांदीतही एक हजार 800 रुपयांनी घसरण होऊन ती 68 हजार 700 रुपयांवर आली. नऊ महिन्यांनंतर सोनं पुन्हा  47 हजारांच्या खाली तर सहा महिन्यांनंतर चांदी 69 हजारांच्या खाली आली आहे.


लॉकडाऊन असले तरी गेल्या वर्षी मे महिन्यात बाजारात उलाढाल होऊन सोने-चांदीचे भाव वाढत गेले. दिवाळीपर्यंत ही भाववाढ कायम राहत त्यानंतर भाव कमी-कमी होऊ लागले. आता अर्थसंकल्पात आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात झाली व तेव्हापासून भाव कमी होत गेले.