मुंबई: सोनं आणि चांदीचा भाव मागील काही दिवसांपासून खूपच खाली पडला होता. पण आज आठवड्याची सुरूवात थोडी चांगली झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आज सोन्याचा  भाव पुन्हा चढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत आज रूपये 43 हजार 530  प्रति 10 ग्राम आहे. खूप दिवसानंतर सोन्याला भाव आल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक (Investment) म्हणून पाहणाऱ्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे.

 

4 मुख्य शहरांमधील सोन्याची किंमत

शहर  22 कॅरेट सोनं   24 कॅरेट सोनं
दिल्ली 43 हजार 870  प्रति 10 ग्राम 47 हजार 860 प्रति 10 ग्राम
मुंबई
43 हजार  प्रति 10 ग्राम
44 हजार 530 प्रति 10 ग्राम
कोलकाता 44 हजार180  प्रति 10 ग्राम 46 हजार 820 प्रति 10 ग्राम
चेन्नई 42 हजार210  प्रति 10 ग्राम  46 हजार 050 प्रति 10 ग्राम

                  

अजूनही सोनं  स्वस्तचं  

कोरोना काळात गेल्यावर्षी लोकांनी सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक केली होती, यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये MCX वरती 10 ग्राम सोन्याचा भाव 56 हजार 191 रुपये उचांकावर पोहोचला होता. आकड्यांनुसार पाहिलं तर  सोन्याची किंमत  ऑगस्ट 2020 च्या तुलनेत 11,600 रुपये प्रति 10 ग्राम रूपयांनी पडली आहे. 27 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याची किंमत 45 हजार 940 रुपये प्रति 10 ग्राम होती जी आज  44 हजार 530 रुपये प्रति 10 ग्राम आहे.

 

सोन्यासोबत चांदी पण चमकली

सोन्याबरोबरचम  चांदीच्या किंमतीत ही आज वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार खूप खुश आहेत. बाजारात सकळी जरी सोन्या-चांदीला चांगली भाव मिळाला असला, तरी संध्याकाळ पर्यंत बाजारात काही बदल होऊ शकतात आणि याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहीलं आहे. सध्या देशात 4 मोठ्या शहरात चांदीला काय भाव आहे हे तुम्ही खाली पाहू शकता.

 

शहर चांदी ची किंमत
शहर चांदी ची किंमत
दिल्ली  66 हजार 500 रुपये प्रति किलो
मुंबई 66 हजार 500 रुपये प्रति किलो
कोलकता 66 हजार 500 रुपये प्रति किलो
चेन्नई    71 हजार  रुपये प्रति किलो

 


सोन्या-चांदीचा भाव गेल्यावर्षीप्रमाणे मिळाला नसला तरी गुंतवणूकदार आज आनंदी आहेत आणि  सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढतील याच्या अपेक्षेत आहेत.