Gold-Silver Price: बापरे! सोन्याचे दर विक्रम मोडणार? पाहा सोनं-चांदीचे आजचे दर
Gold Silver Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आजही दरात मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे आजचे दर...
Gold Silver Price Today in Marathi : गेल्या दोन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे नऊ हजार रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू असताना आतइस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. याचा परिणान महागाईवर दिसून येतो. यामध्ये केवळ पेट्रोल आणि डिझेलचे दर नाहीतर सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर काय आहेत ते पाहूया...
सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (14 एप्रिल) 72,030 रुपये आहे. तर चांदी प्रति किलो 83,390 रुपये विकली जात आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 65,908 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तेच पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,908 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 71,900 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 71,900 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 71,900 रुपये आहे.
तर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 24 कॅरेट सोने 73,174 रुपये, 23 कॅरेट सोने 72,881 रुपये, 22 कॅरेट सोने 67,027 रुपये, 18 कॅरेट सोने 54,881 रुपये, 14 कॅरेट सोने 42,807 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. एक किलो चांदीचा भाव 83,819 रुपये होता. फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या क्रूसिबलवर कोणताही कर किंवा शुल्क नाही. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश केल्यामुळे किमतीत तफावत दिसून येत आहे.
चांदीच्या दरात ही वाढ
एप्रिल महिन्यात चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली असून पहिल्या 10 दिवसांत चांदी 8 हजार रुपयांनी महाग झाली आहे. दरम्यान 8 एप्रिल आणि 10 एप्रिलला चांदीच्या दरात 1,000 रुपयांनी वाढ झाली. तर 12 एप्रिलला 1500 रुपये किलो चांदीची विक्री झाली. आज एक किलो चांदीची किंमत 85,500 रुपये आहे.