Gold Silver Price Today in Marathi: देशात सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. या लग्नसराई लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. मात्र आता या लग्नसराईमध्ये ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ.  ही वाढ पाहून अनेकांनी सोने खरेदी बंद केली आहे. याचा फटका बाजारात अनेकांना बसतो. भारतीय सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. आज पुन्हा सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात 227 रुपयांनी तर चांदीच्या दरात आज 1,166 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सोन्याचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. जुन्या काळी राजा-सम्राटाचा मुकुट आणि दागिन्यांपासून ते नाण्यांपर्यंत फक्त सोन्याचे असायचे. आजह लोकांची सोन्यांबद्दलची आवड कमी झालेली नाही. विशेषत; महिलांना सोन्याचे दागिने खरेदी करण्याची हौस फार असते. सोने हा जगातील सर्वाधिक आवडत्या धातूंपैकी एक आहे. सोन्याच्या धातूपासून शुद्ध सोने मिळवण्याची प्रक्रिया खूप महाग आहे. त्यामुळे सोने आजही खूप महाग आहे.  24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (15 एप्रिल 2024 ) 72,030 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात, मौल्यवान धातूची किंमत 72,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार चांदी प्रति किलो 83,390 रुपये विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 83,380 रुपये प्रति किलो होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.


मुंबई-पुण्यातील सोनं-चांदीचे दर 


तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 65,908 रुपये आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,908 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 71,900 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 71,900 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,908 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 71,900 रुपये आहे.