Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही  मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली. ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागते. डिसेंबर 2023 मध्ये सोनं आणि चांदीच्या किंमतींना नव्या उच्चांकावर भरारी घेतली तर किंमत काहीप्रमाणात कमी झाली असली तरी आजही सोनं-चांदीची भरारी सुरुच आहे. गेल्या 9 वर्षात सोन्याच्या दरात तिप्पटीने वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोनं-चांदीचे  दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी थोडा खिशावर आणखी भार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारातील घडामोड, भू-राजकीय तणाव, चीनच्या मध्यमवर्गीय आणि देशांतर्गत धोरण, सोने-चांदीची तुफान खरेदी, रुपयांची घसरण यासर्व गोष्टींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 2015 मध्ये सोन्याची किंमत 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. मात्र आज 24 कॅरेटची किंमत 71,598 रुपये आहे. 9 वर्षानंतर सोनं तिप्पटीने वाढलं आहे. 


पुन्हा सोनं महाग


गेल्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले आणि  430 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवार 22 एप्रिल रोजी सोन्याचा दर दररोज 550 रुपयांनी घसरला. मंगळवारी सोने 1530 रुपयांनी विकले गेले. बुधवारी भावात 450 रुपयांनी वाढ झाली. तर आज (25 एप्रिल 2024) GoodReturns नुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


चांदीचे दर जैसे


गेल्या आठवड्यापासून चांदीच्या दरात घसरण सुरू असून 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर  22 एप्रिलला चांदी 1 हजार रुपयांनी घसरली.  आज (25 एप्रिल 2024 ) एक किलो चांदीची किंमत 82,900 रुपये आहे. सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या क्रूसिबलवर कोणताही कर किंवा शुल्क लागू होत नाही आणि सराफा बाजारात शुल्क आणि कर जोडल्यामुळे किंमतीतील फरक दिसून येतो.