अमर काणे, झी मीडिया, नागपूर: विदर्भात मुबलक वनसंपदा व खनिजसंपदा आहे. आता विदर्भाच्या विपुल खनिज संपत्ती असलेल्या भूगर्भात सोन्याचा साठाही आहे. हा सोन्याचा खजिना शोधण्यासाठी भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI-Geological survey of India) विदर्भच्या जमिनीचा आत काय दडलंय याचा शोध लावला आहे. त्यांना पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचे साठा आढळून आला आहे. जीएसआयच्या वैज्ञानिकांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. हा अहवाल 1984-85 मध्ये सादर करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर त येथील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोली येथील भूगर्भातील सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सोन्याचा साठा असल्याची बाब पुढे आली आहे तसेच गडचिरोलीचे जिल्ह्यात घनदाट जंगल आणि पहाडात सोन्याचा साठा आहे. (gold treasure hidden underground in Vidarbha maharashtra news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI) सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर, परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या (अयस्क-- Gold ore) असल्याचं वैज्ञानिक यांचं म्हणणं आहे. या परिसरामध्ये अनेक सर्वेक्षण जीएसआय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय भू वैज्ञानिकांनी केले आहे. भूगर्भात सोन्याचा साठा असण्याची शक्यतेने या परिसरातील बहुतांश स्थानिकांनीही आपल्या शेती कधी विकण्याचा विचार केला नाही. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


आजच्या निकषांनुसार सांगायच झाल्यास त्यावेळी केल्या गेलेलं सर्वेक्षण हे G4 स्तरावरील होतं. त्यामुळे त्यात सोन्याचा साठा आहे हे स्पष्ट झालं तरी किती vibale (economical) आहे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अधिक सर्व्हेक्षणाची गरज आहे. सोनं असल तर त्या सोन्याला भूगर्भ बाहेर चढण्याचा खर्चाच्या तुलनेत मिळणार सोनं हे खरंच नफ्याच आहे की नाही हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला अशी ओरड नक्कीच असते. पण हे जमिनीत दडलेलं सोनं नागपूर जिल्ह्यातील भिवापूर आणि गडचिरोलीच्या परिसरातून काढण्यात यश आलं तर नक्कीच महराष्ट्राला समृध्द करेल यात शंका नाही.