त्या गावात 30 दिवसानंतर उगवली सुवर्ण सकाळ
झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर दलित वस्तीत पोहोचले पाणी
अमरावती : गेल्या २८ दिवसांपासून सावंगी मग्रापूर गावातील पाण्यासाठी तडफडणाऱ्या दलित कुटूंबियांच्या घरी 30 दिवसानंतर सुवर्ण सकाळ उगवली आहे. झी 24 तासने दाखविलेल्या बातमीमुळे जाग्या झालेल्या प्रशासनाने या कुटुंबियांच्या घरी तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था केलीय.
सावंगी मग्रापूर गावात दलित वस्तीत जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीने एक महिन्यापासून पाणीपुरवठा बंद केला होता. पाणी पुरवठाच होत नसल्याने दलित कुटुंबीयांनी गाव सोडलं आणि गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केलं होतं.
सदर ग्रामस्थांची ही खदखद सर्वप्रथम झी २४ तासने सर्वासमोर आणली. दोन दिवसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने या दलित वस्तीत तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तब्बल 30 दिवसानंतर या दलित वस्तीत पाणी पोहोचल्याने दलित वस्तीतील नागरिकांनी झी 24 तासचे आभार मानले आहे.