वर्धा : विदर्भातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांच्या एका ग्रुपने साईचरणी १ किलो ५० ग्रॅमची सोन्याची थाळी अर्पण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे ३३ लाख किंमतची ही सोन्याची थाळी असल्याचे सांगण्यात येत आहे. नैवेद्य चढविण्याठी ही थाळी साईचरणी ही थाळी अर्पण करण्यात आलीय.


साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साई चर्म चरण पादुका दर्शनासाठी नागपुरात ठेवण्यात आल्या होत्या. 


तब्बल ४१ वर्षानंतर या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. हे औचित्य साधून एका भक्तांच्या ग्रुपने भाविकाने साईचरणी ही १ किलो ५० ग्रॅम वजनची सोन्याची थाळी अर्पण केली.