प्रवीण तांडेकर, झी 24 तास, गोंदिया : कारवरचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले यांच्या कारला हा अपघात झाला. गोंदिया जिल्ह्यातील वडेगाव सर्रा गावाजवळ अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारने दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली असल्याने दुचाकीवरील 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. चिंतामण रहांगडाले हे आपल्या गाडीने सर्रा गावावरून तिरोडा इथे जात होते. गाडीचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.


दुचाकीवरील दोन जण या भीषण अपघातात जागीच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जणांनी जीव गमवला आहे. गाडी इतक्या वेगाने होती की रस्त्याच्या खाली असलेल्या शेतात उलटी झाली. 


गाडी चालक चीतामन रहांगडाले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.