प्रविण तांडेलकर, झी 24 तास, गोंदीया:  आपण नेहमीच बोगस डॉक्टरांबद्दलची अनेक प्रकरण ऐकत असतो. अधिकृत शिक्षण नसतान रुग्णांना ते गोळ्या औषधे लिहून देतात. पण बोगस डॉक्टर अवैध गर्भपात करत असेल तर त्याला काय म्हणावं? हे ऐकून आपल्याला धक्का बसेल. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावमध्ये हा प्रकार घडलाय. नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने बोगस डॉक्टरांच्या सुटसुकाट रोखण्यासाठी अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई केली. अशातच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नव्या हॉस्पिटल चालवत असलेला डॉ. नीतेश बाजपेयी यांनी बोगस दवाखाना या ठिकाणी सुरू केला. यात विविध प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी येत असल्याचे त्यांनी बोर्डावर दाखविले. आणि या दवाखान्यात तो डॉक्टर म्हणून गेल्या सहा महिन्यापासून कार्यरत आहे. 


आपल्या नावासमोर एमडी. डीएनबी अशी उपाधी त्याने लावली आहे, मात्र हा डॉक्टर नसल्याचे जिल्हा सल्य चिकित्सक अमरीश मोहबे यांनी सांगितले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिसांनी या दवाखान्यावर धाड मारली. त्यावेळी दवाखान्यामध्ये एक महिला दीड महिन्याची गर्भवती असताना तिचा गर्भपात करण्यात आला होता. दवाखान्यातच महिला उपस्थित होती. त्यामुळे या दवाखान्यामध्ये अवैध रूपाने गर्भपात केल्या जात असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला. 


पोलिसांनी या दवाखान्यावर कारवाई केली आणि बोगस डॉक्टरांविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता तरी अशाप्रकार खुलेआम चालणाऱ्या बोगस डॉक्टर, रुग्णालयांवर अंकुश बसेल का आणि अवैध रित्या होत असणारे गर्भपात थांबतील का? अशा प्रश्न नागरिकांना पडत आहे.


विशेष बाब म्हणजे नितेश वाजपाईवर कोविड काळामध्ये अवैध रूपाने हॉस्पिटल उघडल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याने आपल्याकडे बीएएमएस डिग्री असल्याचे दाखवले होते. याबाबत संबंधित युनिव्हर्सिटीला विचारणा केले असता त्याची डिग्री बोगस असल्याचे वृत्त समोर आले. 


एकदा गुन्हा दाखल होऊनसुद्धा या बोगस डॉक्टरांवर मोठी कारवाई झाली नाही. त्यामुळे हा दुसरा दवाखाना उघडला की काय? त्यामुळे डॉक्टरांवर आता शासनाच्या अंकुश आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.