आनंदाची बातमी : येत्या १ जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. गेले काही दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. 'येत्या १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू होईल' अशी माहिती आज राज्याचे वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार कपिल पाटील आणि इतर आमदारांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली.