रत्नागिरी : येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या विमानतळाचं काम रखडलं होतं. मात्र रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आल्यानंतर कामाला वेग आला आहे. रत्नागिरीच्या विमानतळावर सुसज्ज अशी दोन किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.


या विमानतळासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे कामाला थोडा विलंब झाल्याची कबुली अधिका-यांनी दिली आहे. मात्र कामाला वेग आला असून २०२० पासून २४तास विमानसेवा रत्नागिरीकरांना उपलब्ध होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिली आहे. 


कोकणातून विमान सेवा सुरु झाली तर नक्कीच याचा फायदा हा कोकणच्या विकासासाठी होईल. पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे वळतील.