प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी येतेय. कशेडी घाटातला प्रवास हा प्रत्येक कोकणवासियासाठी डोकेदुखी असते. खराब रस्त्यांमुळे हा प्रवास जिवघेणा ठरतो. या प्रवासात वेळ देखील जास्त लागतो. पण आता कोकणवासियांना हे चित्र बदललेलं दिसणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत सुखकर  होणार आहे. कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचं काम सध्या सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जवळपास २०० कामगार यासाठी दिवसरात्र काम करताय. कशेडीचा अवघड आणि धोकादायक घाट रस्ता पार करायला 40 ते 45 मिनिटं लागतात. मात्र बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात होणार आहे. ४०० कोटी रुपये यासाठी खर्च केले जातायत.