मराठा आंदोलन : नाशिकमध्ये कडकडीत बंद
नाशिकमध्ये बंदला चांगला प्रतिसाद
नाशिक : नाशिकमध्येही आज बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठ, व्यापारी, दुकानदारांना बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुद उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला. लोकप्रतिनिधींच्या घरांपुढे टाळ मृदुंग भजन आंदोलन केलं जाणार आहे. बंदच्या पाश्वभूमीवर पालकांनी आज मुलांना शाळेत न पाठवण्यचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये काही भागात आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली. तर काही आंदोलकांनी दुकानांवर दगडफेकही केली. आंदोलक हजारोंच्या संख्येनं असल्यानं पोलिसांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलक गटा गटात विविध परिसरात दुकानं बंद करण्यासाठी पांगले आणि आक्रमक झाले. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.