सातारा : साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उकळत्या चुन्यात टाकून एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. उकळता चुना अंगावर पडल्याने मुलाचा हात 9 टक्के भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला काही गुंडांनी बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे मारहाणीदरम्यान मुलाला चक्क उकळत्या चुन्यात ढकलून दिलं. 


अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या नितीन सोडमिसे या गुंडाने आणि त्याच्या मित्रांनी शुक्कल कारणातून ही मारहाण केली. या मारहाणीत मुलगा जखमी झाला आहे.  मुलाचा हाताला आणि शरीरावर ठीक ठिकाणी भाजलं आहे. त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संबंधित आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं जखमी मुलाचे सांगणं आहे


सातारा पोलिसांची टाळाटाळ
ही घटना एवढी गंभीर असताना आणि जखमी मुलगा अंगावर चुना असलेल्या अवस्थेत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेला असताना देखील संबंधित आरोपींवर सकाळ पर्यंत कोणतीही कारवाई सातारा पोलिसांनी केली नाही. मात्र झी 24 तास ने ही बातमी दाखवल्या नंतर सातारा शहर पोलिसांनी या जखमी तरुणाचा शोध घेवून त्याची तक्रार घेण्याचं काम सुरू केलं आहे


राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे. असं असताना आरोपींवर 12 तास उलटून देखील सातारा शहर पोलिस कोणतीही कारवाई करत नाही.