चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना रोखले, पोलिसांमध्ये बाचाबाची
Ahilyadevi Holkar Jayanti 2022 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) जयंतीदिनानिमित्त कार्यक्रमनिमित्ता आयोजित कार्यक्रमाच्यावेळी चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळे राडा पाहायला मिळाला.
अहमदनगर : Ahilyadevi Holkar Jayanti 2022 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) जयंतीदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज चौंडीमध्ये आहेत. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हेही आज चौंडीत आहेत. याठिकाणी वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर वादाची ठिणगी पडली. अहमदनगरच्या चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळे राडा पाहायला मिळाला. नाशिकच्या शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच वाद निर्माण झाला. बसण्यावरुन हा वाद निर्माण झाल्याने येथे गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी आमच्यावर बळाचा वापर केल्याचा आरोप पडळकर आणि खोत यांनी केला आहे.
चौंडीत जाण्यापासून पडळकर आणि खोत यांना रोखल्याने कार्यकर्ते संतप्त झालेत. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्याला जाताना आमची अडवणूक का, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. आम्ही यात्रेवर ठाम आहे, गोपीचंद पडळकर म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले. पवारांनी समोरासमोर सभा लावावी असे सांगत शरद पवार यांचे हे कुठलं पुरोगामित्व, असे पडळकर म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297 वी जयंती नगरमधील चौंडी इथं साजरी करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा होऊ लागलेत.
मात्र या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद उफाळल्याचं दिसून येते आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. हा जयंती सोहळा नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे, अशी टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केलीय. तर त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले.
1993 च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसलेत. त्या भ्रष्टाचारी आणि जातीयवादी लोकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होते. त्या जातीयवादी लोकांचे हात अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला लागले होते. त्यामुळे आज अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन त्याचं शुद्धीकरण करणार असल्याचं पढलकरांनी म्हटले आहे.