मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी मेहता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोकायुक्तांना मेहता यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 


ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतू हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती.


दरम्यान, एसआरए घोटाळ्याचं हे प्रकरण विधानसभेत चांगलंच गाजलं होतं. विरोधकांनी या घोटाळ्यावरून विधानसभेत जोरदार हंगामा करत मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचं आश्वासन दिलं होतं.