Udayanraje Bhosale protest : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) उद्या रायगडावर ( Raigad )आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आज ते सातऱ्यातून रवाना होतील. ( Maharashtra Politics) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी केलेल्या विधानानंतर त्यांना पदमुक्त करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली होती. (Maharashtra News in Marathi) मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज दुपारी ते रायगडाच्या दिशेने रवाना होतील. त्याआधी सातारा शहरातील पवई नाका इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. संध्याकाळी महाडमध्ये मुक्काम करून ते उद्या सकाळी रायगडवर पोहोचून आक्रोश आंदोलन करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचे संपूर्ण पडसाद उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी अनेकांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले होते. राज्यपालांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. 



कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन उदयनराजे  यांनी सुद्धा वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. उदयनराजे भोसले या विधानानंतर भावू झाले होते. हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी बरं झालं असत. येत्या 3 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.