मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली. 



 


बार, रेस्तराँ आणि समुद्रकिनारे खुले होतात. पण, दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे, असा उपरोधिक टोला राज्यपालांनी लगावला. दरम्यान, राज्यपालांनी हे पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्या बऱ्याच ठिकाणी मंदिरं पुन्हा उघडण्यासाठी आंदोलनं केली गेल्याचं पाहायला मिळाली. भाजपच्या नेतृत्त्वाखाली विविध ठिकाणी ही आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे राज्यपालांच्या या पत्रामुळं पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल अशा संघर्षानं डोकं वर काढलं आहे.