पानसरे हत्या प्रकरणी आणखी तीन मारेकऱ्यांना घेतले ताब्यात
पानसरे हत्या प्रकरणातील आणखी तीन मारेकऱ्यांना मुंबई, पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी तीन मारेकऱ्यांना मुंबई, पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन अंदुरे, अमित बद्दी, गणेश मिश्किन यांना एसआयटीने ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयात या संशयित आरोपींना हजर केले जाणार आहे. अंदुरे, बद्दी आणि मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे.
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी विचारवंत पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यात गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरूंगातून ताब्यात घेण्यात आले आहे. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन यांना मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे.