प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर : तुमच्या घरी कचरा गाडी आली नाही.. कचरा उचलणा-या ठेकेदाराबद्दल तुमची काही तक्रार आहे. तर आता काळजी करण्याची काहीही गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमनेर नगर परिषदेनं त्यासाठी खास उपाययोजना केलीय. नगरपरिषदेकडून १६ घंटा गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात आलीय. नगरपरिषदेकडून शहरातल्या १३ वॉर्डचं रुट मॅपिंग करण्यात आलं आहे. 


दिलेल्या मार्गावर वेळीच गाड्या जावून कचरा गोळा करतायत की नाही? नागरिकांना काय समस्या आहेत...त्यांच्या तक्रारींचं निराकरण होतंय की नाही? ठेकेदारांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं तसंच घंटा गाडींचं मूल्यमापन करणं आता नगर परिषदेला सोप्पं जाणार आहे. 


संगमनेर नगर परिषदेचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे... इतरही नगर परिषदांनी, महापालिकांनी याबद्दल विचार केल्यास नक्कीच गावं, शहरं कचरामुक्त होतील.