रत्नागिरी : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक त्या ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. 


या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने येत्या ३ ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्र व राज्यातील अधिकाऱ्यांची  महत्वपूर्ण बैठक होणार आहे. येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि संपूर्ण वायफाय म्हणून कोकण हा राज्यातील पहिला प्रदेश असेल, असा दावाही गीते यांनी केलाय.


शाळेतील वेगळा उपक्रम