ग्रामपंचायत निवडणूक: 3 गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चर्चेत
मतमोजणी दरम्यान तीन गावातील उमेदवारांना समान मते
पुणे : भोर ग्रामपंचायतीच्या मतमोजणी दरम्यान तीन गावातील उमेदवारांना समान मते पडले आहेत. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. निवडणूक निकालामध्ये अनेकदा अशा वेगळ्या घटना पाहायला मिळतात. अशीच घटना पुण्यातील भोर ग्रामपंचायतीत पाहायला मिळाली आहे.
पुणे जिह्यातील भोर ग्रामपंचायतीच्या मतमोजणी दरम्यान तीन गावांची गंमतशीर मतमोजणी पहिला मिळाली. तीन गावातील उमेदवारांना समान मते पडले. त्यामुळे काही वेळ सगळ्यांचेच लक्ष या दिवळे, वेळू,आणि जांभळी गावच्या निकालाकडे लागले. त्यामुळे उमेदवारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. अखेर लहान मुलीच्या हस्ते चिठ्य्या काढून निकालाची घोषणा करण्यात आली. ज्यामुध्ये दिवळे गावातून निलेश पांगरे, वेळू गावातून सारिका जाधव आणि जांभळी गावातून शालिनी कदम हे उमेदवार विजयी ठरले.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल