Gram panchayat Election Result : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे.  रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आले  आहे. याचदरम्यान रायगड जिल्ह्यातून एक बातमी येते ती म्हणजे, एका 24 वर्षीय तरूणीने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली. या तरूणीला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने या तरूणीने विजय मिळवला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीने जिंकली ग्रामस्थांची मते आणि मने 


रायगड जिल्ह्यात (Raigad Gram Panchayat Result 2022) पाहिले 8 निकाल जाहीर झाले आहेत. महाड तालुक्यात शिवसेना-शिंदे गटाची आघाडी आहे. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. तर, 2 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडं गेल्या आहेत. याचदरम्यान रायगड मधील दासगाव येथील 24 वर्षीय तपस्या जंगम (Tapasya Jangam) हिने राजकारणात उडी घेत पहिलाच प्रयत्न तिचा यशस्वी ठरला आहे.


वाचा : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी? 


तपस्याने नुकतीच हॉटेल मॅनेमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने तिने विजय मिळवला. गावच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच आपण राजकारणात उतरल्याचे तपस्याने सांगितले. तिच्या विजयानंतर ग्रामस्थानी एकच जल्लोष साजरा केला. कमी वयात तपस्याने  ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली. रायगड जिल्ह्यातील दासगावमधून सर्वत्र भागातून तिचे कौतुक होत आहे. 


निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या


अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.