Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
20 Dec 2022, 15:33 वाजता
राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार, शिंदें गटाचा विजय
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाचा विजय । साता-यातील राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार । कोरेगाव तालुक्यात 51 पैकी34 जागांवर मिळाला आमदार महेश शिदेंच्या गटाचा मोठा विजय
20 Dec 2022, 15:01 वाजता
जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झालाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले.यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झालाय.
20 Dec 2022, 14:37 वाजता
माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी राखला गड
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : अहमदनगर जिल्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी गड राखला..नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतवर ठाकरे गटाची सत्ता..नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत गडाखांनी राखल्या..सर्व ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा वरचष्मा...
20 Dec 2022, 14:36 वाजता
जवखेडा खुर्द ग्रामपंचायतवर दानवे गटाची सत्ता
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जालना जिल्ह्यातील जवखेडा खुर्द ग्रामपंचायतवर सत्ता अबाधित ठेवल्याने रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांनी फुगडी खेळून व्यक्त केला आनंद
20 Dec 2022, 14:32 वाजता
चिठ्ठी टाकून शिवसेनेचा सरपंच
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील माईन गावात सरपंच पदाला समसमान मते । चिठ्ठी टाकून सरपंच पदाची निवड । शिवसेनेच्या उमेदवारांचे भाग्य फळफळले । माईन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच
20 Dec 2022, 14:29 वाजता
चिठ्ठी टाकून सरपंच निवड
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : सांगली- रसुलवाडी आणि सावळीमध्ये उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून केली निवड. । रसूल वाडीमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी संजय धोंडीराम जाधव विजयी.उत्तम काटकर पराभूत । दोघांना 54 अशी समान मते पडली होती.लहान मुलांना चिठ्ठी उचलून निवडला विजयी उमेदवार । सावळी ग्रामपंचायत सदस्य पदी कल्पना रावसाहेब शिंदे हे विजयी. । अश्विनी शिंदे पराभूत । त्यांना 189 समान मते पडली होती. लहान मुलांना चिठ्ठी उचलून निवडला विजयी उमेदवार
20 Dec 2022, 14:28 वाजता
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एकूण 8 ग्रामपंचायतींचे निकाल -
भाजपा -5
राष्ट्रवादी काँग्रेस -1
अपक्ष -1
रिक्त -1 (परंतु भाजपाचा पॅनेल विजयी)
20 Dec 2022, 13:51 वाजता
20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. साताऱ्यातील फलटणमध्ये राष्ट्रवादीने बालेकिल्ल्यातील गड कायम राखला आहे. 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. मात्र पंचवीस वर्षाची सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विडणी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे.
20 Dec 2022, 13:50 वाजता
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाची सरशी
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : बीड आणि शिरूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाकडे गेल्या आहेत. बीड तालुक्यात इट, साक्षाळ पिंपरी, पारगाव ,शिरस, कुकडगाव, काठोडा, बराणपुर , काळेवाडी, आंबेसावळी, जुजगव्हाण , काळेगाव, हवेली, जरूर, सांडरवण , पिंपळादेवी, ग्रामपंचायत वर माजी मंत्री क्षीरसागर गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत
20 Dec 2022, 13:10 वाजता
सिंधुदुर्गात भाजपची सरशी
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : सिंधुदुर्गात जिल्ह्यात भाजपची घौडदौड कायम. आमदार नितेश राणे यांचा करिष्मा ही कायम दिसून आलाय. मात्र सर्वांना उत्सुकता कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निकालाची.याच ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.नांदगाव हे शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांचे गाव असल्यामुळे खोत आणि आमदार वैभव नाईक यांनी प्रतिष्ठा केली होती.तर भाजपचे आमदार राणे यांच्या मतदारसंघातील नांदगाव हे गाव असल्यामुळे त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.