मुंबई : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. मराठी नविन वर्षांचा पहिला दिवस. यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण आहे. यादिवशी नविन संवत्सराचा प्रारंभ होतो याठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी उभारल्या जातात


अयोध्येचा विजयोत्सव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करुन विजयी होउन जेव्हा अयोध्येत परतले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. अयोध्या नगरी श्रीरामाच्या या विजयाने आनंदून गेली होती. त्याचाच भाग म्हणून घरोघरी गुढी उभारल्या जातात अशा अनेक अख्यायिका आहेत.


नववर्षाच स्वागतं 


यादिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात श्रीखंड पुरी,शेवयांची खीर असा बेत आखला जातो.


रांगोळ्यांची कलाकुसर, मोटारसायकलींवर स्वार झालेल्या महिला व पुरूष, विविध ढोल पथकांची  गर्जना, ध्वजापथकांची आकर्ष सादरीकरण,  तलवारबाजी, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ असा दिंडी सोहळा ठिकठिकाणी निघतो आणि नववर्षाचं स्वागत केलं जातं