Alphonso Mango How To Identify in marathi : दारावर शोभे उंच गुढी नव्या वर्षाच्या सोबतीला हापूस आंब्याची गोडी...गुढीपाडवा (Gudi Padwa 2023)  हिंदू लोकांचं नवीन वर्ष (Hindu New Year 2023)...श्रीखंड पुरीसोबत (Shrikhand Puri) अनेक घरांमध्ये पुरण पोळी केली जाते. तर मुंबई आणि कोकणात हापूस आंबाची पहिली पेटी घरी येते. (Gudi Padwa 2023 Alphonso Mango How To Identify original Hapus Mango simple steps video in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा म्हटलं की, हापूस आंबावर (Alphonso Mango) मस्त पैकी ताव...फळांचा राजा आंब्याची (Hapus Mango) गोडची काही औरच असते आणि त्यात हापूस म्हटलं की राव विषय संपला. पण गेल्या काही वर्षांमध्ये हापूसच्या नावावर डुप्लिकेट हापूस मार्केटमध्ये आला आहे. या हापूसच्या (Mango Market) नावावर ग्राहकांची फसवणूक केली जाते. चवीसोबतच आर्थिक फटका ग्राहकांना बसतो. मग अशावेळी अस्सल हापूस आंबा ओळखायचा कसा? जर तुम्ही हापूस खरेदी करणार असाल तर या काही टॅक्ट्स नक्की लक्षात ठेवा. (mango price in mumbai)


कसा ओळखावा अस्सल हापूस?


  1.  हापूसचा देठ खोल असतो. 

  2.  हापूस कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो. 

  3. हापूसची साल पातळ असते.

  4.  त्याचा सुंगध हा वेगळा असतो. 

  5.  त्याचा बॉटलग्रीन कलर असतो.


पाहा व्हिडीओ आणि समजून घ्या कसा ओळखायचा हापूस आंबा



त्यामुळे मार्केटमधून देवगड आणि रत्नागिरी हापूस विकत घेताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा. हापूस घेताना त्याची साल पातळ आहे की नाही शिवाय जर त्याला साल काढून पाहता आलं तर नक्की बघा. कारण हापूस सारखे दिसणारे आंबे हे बाहेरून हिरवे तर आतून पिवळे असतात. चला तर मग गुढीपाडवा आणि नंतर अख्खा उन्हाळा मस्त अस्सल हापूस आंबावर ताव मारा.