Tadoba Festival In Maharashtra: ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. हजारो पर्यटक येथे भेट देतात. १ ते 3 मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव २०२४चे आयोजन करण्यात आले होते. याच महोत्सवादरम्यान ताडोबाने नवा विक्रम रचला आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तोडाबाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कारण ताडोबात 65 हजार 724 रोपट्यांचा वापर करुन भारतमाता लिहण्यात आलं होतं. महाराष्ट्र वन विभागाकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (Maharashtra,Guinness World Record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 1 मार्चपासून हा महोत्सव सुरू झाला होता. याचवेळी विश्वविक्रम रचण्यात आला आहे. 26 प्रकारच्या स्वदेशी रोपांचा वापर यावेळी करण्यात आला. तर, एकूण 65 हजार 724 रोपांच्या मदतीने भारतमाता हा शब्द लिहण्यात आला. याचे आयोजन रामबाग फॉरेस्ट कॉलोनी ग्राउंडमध्ये करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. 


महाराष्ट्र वनविभागाचा विश्वविक्रम


महाराष्ट्र वनविभागाने आयोजन केलेल्या महोत्सवासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून एक टीम तिथे उपस्थित होता. त्यांनी संपूर्ण तपासणीनंतर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा केली आणि त्याचे प्रमाणपत्र वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सोपवण्यात आले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वन विभागाने गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.


ग्रीन भारतमातेचा संकल्प 


विश्वविक्रमानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असून ही आमच्यासाठी केवळ एक फोटो फ्रेम नसून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महामार्ग आहे. तसंच, या उपक्रमासाठी झटणाऱ्या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. 


उद्यान तयार करण्याच्या सूचना


दरम्यान, भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे  चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरित साकारावे. तसंच, नवीन उद्यानात भारतमाता याच शब्दाप्रमाणे रोपं लावावीत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.