आता गुलाबरावही राणेंवर बोलायला लागले...
जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
शिर्डी : जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
विशेष म्हणजे मंत्रीपदासाठी आस लावून बसलेले गुलाबराव पाटील, यांना आता कुठे राज्यमंत्रीपद हाती लागलं आहे, आणि त्यांनी आता एकावेळचे मातब्बर नेते नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधायला सुरूवात केली आहे.
नारायण राणेंच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा आता हे जनतेने ठरवाव, शिवसेना- काँग्रेस संपविण्याची भाषा करण्यापेक्षा आपण कोण आहोत, हे राणेंनी आपल्या जीवनात तपासले तर बरी होईल, असं वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शिर्डी येथे केलं आहे.
गुलाबराव पाटील याच्या हस्ते आज शिर्डी येथे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन आणि बुलढाणा पतसंस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सहकार प्रशिक्षण भवनाचे उदघाटन करण्यात आलं, त्या वेळी गुलाबराव पाटील यांनी राणेंवर टीका केली.