नाशिक : शिक्षण विभागाला (Education Department) हादरवरुन सोडणारी एक बातमी 'झी २४ तास'च्या हाती लागली आहे. केंद्र सरकारच्या धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर (Minority Student Scholarship ) हॅकर्सचा डल्ला (Hackers Attack ) मारल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एक दोन नव्हे तर तबब्ल 320 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हॅकर्सनी गायब केली आहे. (Hackers Attack on Minority Student Scholarship at Nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गायब झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या नावे रक्कम हडप करणारे कोण आहेत याचा शोध आता सुरु करण्यात आला आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व योजनेअंतर्गत दहा हजार रुपये देण्यात येतात 2014-15 पासून या योजनेच्या अंमलबजावणी सुरू झाली आहे.


यासाठी प्रत्येक शाळेला स्कॉलरशिप पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी लॉगिन आयडी देण्यात येतात. मात्र या शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नसतानाच ही शिष्यवृत्ती नियमितपणे काढून घेतली जात असल्याचे समोर आले आहे.