औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या `हल्लाबोल` मोर्चाची सांगता
आज औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता होतेय.
औरंगाबाद : आज औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता होतेय.
या सांगता मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित आहेत.
यावेळी सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र आणि राज्य सरकारने महापुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली. मात्र कोणत्याही स्मारकाचं काम सुरु झालं नसल्याने मौन व्रत आंदोलनाची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केलीय.
तर धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. सरकारची धोरणं शेतकऱ्यांना मारक असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाडा पिंजून काढला.