Maharashtra Political News : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीयांना मोठा दणका दिला आहे. (Maharashtra News in Marathi) पवार यांचे निकटवर्ती विजय कोलते यांच्या कन्या तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या पत्नी तहसीलदार तृप्ती कोलते (Haveli tehsildar Trupti Kolte ) निलंबित केले आहे.


शरद पवारांच्या निकटवर्तीय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल दिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणुकीत निरपेक्ष काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तृप्ती कोलते या शरद पवारांच्या निकटवर्तीय विजय कोलते यांच्या कन्या आहेत.


कोविड काळातील औषध खरेदीमध्ये अनियमितता? 


तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात चुकीचा निर्णय देणे, कोविड काळातील औषध खरेदीमध्ये अनियमितता तसेच निवडणुकीशी संबंधित कामाबद्दल तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोलते यांना निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.


तृप्ती कोलते दोन वर्षांपासून हवेलीच्या तहसीलदार आहेत. संपूर्ण पुणे शहर आणि परिसरातील भाग त्यांच्या अखत्यारीत येतो. शुक्रवारी रात्री शासनाने कोलते यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. तृप्ती कोलते यांचे पती उमेश पाटील तसेच वडील विजय कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.  तृप्ती कोलते पाटील यांनी धडाडीच्या तसेच कार्यक्षम अधिकारी म्हणून नाव कमावलं आहे. असं असताना त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आला आहे.