लातूर  : लातूर शहरातील अतिक्रमणं महापालिकेनं उठवल्यानंतर शहरातील आंदोलनात वाढ झालीय. आता शहरातील हातगाडा असोसिएशनच्यावतीनं महानगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र आणि राज्य शासनानं राज्यात फेरीवाला धोरण निश्चित केलंय. 7 ऑक्टोबर 2015च्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या क्षेत्रातील फेरीवाल्यांना हे फेरीवाला धोरण अंमलात आणणं गरजेचं आहे.


 मात्र, लातूर महापालिकेनं 2014 मध्ये तीन हजार सहा फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करून फक्त 300 फेरीवाल्यांनाच नोंदणी प्रमाणपत्राचं वितरण केलंय. महापालिकेनं तात्काळ फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करत हातगाडा चालवणा-या कुटुंबीयांची उपासमार थांबवण्याची मागणी या बेमुदत साखळी उपोषणात केली जातायत.