परभणी : आई ही जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे, जी आपल्या मुलांवरती आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करते. आईच्या प्रेमाची तुलना जगात कधीच आणि कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आपल्या बाळाला काही त्रास झाला तरी आईचे मन पहिलं दु:खावलं जातं. आई आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांना देते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणे प्रेम आणि आपुलकी असते. प्राणी असो वा माणूस आईला आपल्या बाळाची काळजी असतेच. स्वत:च्या पोटात वाढवलेल्या आणि स्वत:चा अंश असलेल्या आपल्या बाळाला त्रास झालेला कसं बरं आईला सहन होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्राण्यांनाही माणसांप्रमाणे संवेदना असताता. याचं एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून एका कुत्र्याचं आपल्या पिल्लावरती असलेलं प्रेम समोर आलं आहे.


हा व्हिडीओ परभणी नांदेड महामार्गावरील आहे. येथे राहटी नदीच्या पुलावर  एक हृदयद्रावक चित्र पाहायाल मिळालं आहे. येथे एक कुत्री शांतपणे बसलेली दिसत आहे. ही कुत्री अनेक तासांपासून तेथेच बसून आहे, तेही काहीही हालचाल न करता. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच जणांना प्रश्न पडला की, नेमकं असं काय घडलं असावं?


परंतु  खरं सांगायचं झालं तर, या पुलावरती या कुत्र्याच्या पिल्लाचा अपघात झाला. ज्यानंतर ते पिल्लू मरण पावलं. तेव्हा पासून ही आई तेथेच पुलाच्या कडेला शांतपणे बसली आहे. या आईला एकच आशा लागून राहिली आहे की, जणू आता माझं पिल्लू उठेल आणि पुन्हा आपल्याशी खेळू लागेल. या एकाच आशेवरती ती तेथे बसून आहे. परंतु आता हे होणं काही शक्य नाही. परंतु ते एका आईचं हृदय आहे जे सहजासहजी मागे हटणार नाही.


अनेक जण इथून ये-जा करतायत. पण या मातेचं दुःख पाहून हळहळ व्यक्त करण्या पलिकडे ते दुसरं काही करु शकतं नाहीत.