मुंबई : Heat Wave Alert : राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. राज्यात उकाड्याने सगळे त्रस्त झालेच आहेत. आता पुढील 3 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. कडक उन्हाळा असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलाय. 12 जिल्ह्यांना हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. (Heat Wave Yellow alert for Next 3 Days, Temperature in maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा (Temperature in maharashtra) वाढला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा चटका वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेचा चटका (temperature in maharashtra) वाढला आहे. पुढील पाच दिवस येथे उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.



मार्चच्या अखेरीस विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात उकाडा वाढला होता. तापमानात मोठी वाढ झाली होती. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट (heat wave) येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.