रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. येत्या चार तासांत अतिवृष्टी होणार असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सर्व शासकीय विभाग आणि नागरिकांना विशेषतः नदी किनाऱ्यावरील आणि दरड ग्रस्त भागातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.  आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले असून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.


दुसरीकडे पुणे, मुंबईमध्ये बुधवार रात्रीपासून पावसानं चांगलाच जोर धरला होता. मोठ्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं पुणेकर सुखावले आहेत. शहर तसंच परिसरात सध्या पाऊस सुरु आहे. विशेष करून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे.