नागपूर : नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा येथे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain alert in nagpur and wardha)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथे काही ठिकाणी आणि विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 


विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.


नागपूर शहरात ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी सहापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.


नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 48 तासांकरता 'येलो' अलर्ट जारी केला आहे.