निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहर परिसरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. दरम्यान वाऱ्यामुळे काही भागातील झाडे उन्मळून पडले तर घरांचे छत उडून नुकसान झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी गारांसह कोसळलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने पुन्हा मनमाड शहराला झोडपून काढले. साधारण अर्धा तास सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर वाऱ्यामुळे विवेकानंद नगर भागात असलेल्या चंद्रभागा लॉन्सचे पत्रे उडाले तर काही भागात झाडे उन्मळून पडली.



मनमाड परिसरात पडलेल्या पावसामुळे पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिक काहीसे सुखावले. तर शेकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र मनमाड वगळता परिसरात अज्ञापही पावसाची प्रतीक्षा असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस अद्यापही न बरसल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.