COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून गेल्या आठवडाभरापासून एकाच जागी स्थिर असून, अनुकूल वातावरणाअभावी त्याची पुढील वाटचाल रखडली होती. मात्र काल दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय.  मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार झालं  असून, मान्सून वेगाने उर्वरित महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, ओडिशा,पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये डेरेदाखल होईल,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे... त्याचप्रमाणे येत्या 48 तासांत कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे...


जोरदार पाऊस 


सध्या महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र असून, मध्य महाराष्ट्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच स्थितीमुळे कोकण, गोवा, मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे....20 ते 24 जून पासून दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय.