Maharashtra Weather News: रविवारी `या` जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जाहीर
Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather News: सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय. मान्सूनपूर्व पावसामुळे देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तर आज म्हणजेच रविवारी 14 जुलै रोजी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
'या' जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये शहर आणि उपनगरात हलका ते मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे मुंबईतही आज जोरदार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे. यामध्ये पुढील 48 तास मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित, आजसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
हवामान खात्यानुसार, रविवारी घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सातारा आणि कोल्हापुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, 11 जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान खात्याने शनिवारी रेड अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो.